esakal | सत्तेचा मोह असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प, विनायक मेटेंचा घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Mete

सत्तेचा मोह असल्यामुळे तुम्ही गप्प आहात. मात्र, माझ्या पश्चात शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली, याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होत असेल अशी जहरी टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.

सत्तेचा मोह असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प, विनायक मेटेंचा घणाघात

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार संविधनाचा भंग करताहेत. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये ठेवलं कस? त्यांना काढून टाकायची आपल्यात हिंमत नसेल तर सरकार चालवायला आपण सक्षम नाहीत असे आम्ही समजू. सत्तेचा मोह असल्यामुळे तुम्ही गप्प आहात. मात्र, माझ्या पश्चात शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली, याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होत असेल अशी जहरी टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.

भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, परवानगी न घेता आंदोलन केल्याने कारवाई


गुरुवारी (ता.पाच) शहरात मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेत ते बोलत होते. गायकवाड आयोगाचे माजी सदस्य व माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ श्रीराम पिंगळे, ॲड. अमोल करांडे, नारायगणडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे, लक्ष्मण महाराज रामगडकर, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी परिषदेसाठी तरुण दुचाकी फेऱ्या काढून पोचले. श्री.मेटे म्हणाले, मंत्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणासंदर्भात कुंभकर्णाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समाजावर ही वेळ आली.

मराठा समाजाला बरबाद करायचं काम अशोक चव्हाण करत आहेत का, याचे उत्तर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी द्यावे. वडेट्टीवार यांना ओबीसीचा मसिहा बनायचं आहे म्हणून इतर समाजला दूषण देत आहेत. मात्र तुम्ही मराठा समाजाचे वाईट चिंतु नका, असा इशाराही श्री. मेटे यांनी दिला. एसईबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत इडब्लूएसचे आरक्षण द्यावे. आठ दिवसांत आरक्षण नाही दिले तर १७ तारखेला सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात पिटीशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार शरद पवार यांना मराठा समाज सोडून इतर समाजांचे प्रश्न सोडायला वेळ आहे.

ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, मराठा महासंघाचा इशारा

मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीला बैठक घ्यायला वेळ नाही. काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे. महाविकास आघाडी सरकार आरक्षण देणार नाही, असेही मेटे म्हणाले. सर्जेराव निमसे म्हणाले, गायकवाड आयोगाचा अहवाल मराठा आरक्षण मिळण्यासाठी महत्त्वाचा आहे. घटनापीठातही हा अहवाल मान्य होईल. अॅड. श्रीराम पिंगळे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ लवकर स्थापन होण्याची गरज असून स्थगिती उठविण्याठी शिवसंग्रामतर्फे प्रयत्न केले जात आहेत. निमंत्रक सुधीर काकडे, अशोक सुखवसे, राहुल टेकाळे, मुकुंद गोरे, शशिकांत सावंत, योगेश शेळके, गणेश मस्के, योगेश टेकाडे, सोमनाथ मोटे, अजय शिंदे, महारुद्र जाधव यांच्यासह सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, विनोद कवडे, शेषेराव तांबे, मीरा डावकर, अक्षय माने उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर