
पाणी साठवण्यासाठी घरात ठेवलेल्या टाकीत बुडून उमेश मदन सोळंके या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गंगामसला येथे शुक्रवारी (ता.आठ) घडली आहे.
माजलगाव (जि. बीड) : पाणी साठवण्यासाठी घरात ठेवलेल्या टाकीत बुडून उमेश मदन सोळंके या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गंगामसला येथे शुक्रवारी (ता.आठ) घडली आहे. तालुक्यातील गंगामसला येथील प्रमोद सुदामराव सोळंके यांच्या घरात सांडपाणी साठवण्यासाठी आणलेली टाकी आहे.
पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या, उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना
पण टाकी फुटल्याने टाकीचा वरील भाग कापुन ठेवलेला आहे. शुक्रवारी त्यांचा मुलगा उमेश हा खेळत असतांना हातातील प्लेट या टाकीत पडल्याने काढण्यासाठी गेला आणि त्याचा या टाकीत तोल गेला. खाली डोके वर पाय झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. दरम्यान या घटनेने गंगामसला परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपादन - गणेश पिटेकर