jawan ashok garjesakal
मराठवाडा
Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!
सीआयएसएफ जवानाने मुंबईतील ओएनजीसी मुख्यालयातील राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
गेवराई - बीडमधील गेवराईच्या तलवाडा येथील सीआयएसएफ जवानाने मुंबईतील ओएनजीसी मुख्यालयातील राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. अशोक विष्णू गर्जे (वय-३६) रा. तलवाडा (रामनगर), ता. गेवराई, जि. बीड असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.