
छत्रपती संभाजीनगर : न्यायाच्या चौकटीत राहून दिलेला न्याय परिपूर्ण असेलच असे नाही. मात्र, कायद्याच्या बरोबरच सामाजिक भान ठेवून दिलेला न्याय महत्त्वाचा आहे. न्यायमूर्ती हा समाजात मिसळणारा असला तर त्याला समाजातील प्रश्न, समस्या यांचे चांगले आकलन होते. न्यायाधीशांनी घटनात्मक मूल्यांची बांधिलकी ठेवली तर न्यायदान सुकर होते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.