

Udgir Violence: Two Groups Clash, Police Register Case Against 47
esakal
-युवराज धोतरे
उदगीर, (जि. लातुर) : शहरातील मुसानगर परिसरात शनिवारी (ता.४) रात्री उशिरा दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेत शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी तब्बल ३७ आरोपींसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.