Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

बीड नगरपालिकेत ​विरोधक गप्प, अन् सत्ताधारीच आमनेसामने; सर्वसाधारण सभा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात.
Beed Municipal Council

Beed Municipal Council

sakal

Updated on

- नितीन चव्हाण

बीड - बीड नगरपालिकेच्या राजकारणात विरोधकांनी शड्डू ठोकण्याची अजिबात गरज उरलेली नाही, कारण सत्ताधारी पक्षातीलच धुरंधर एकमेकांची वस्त्रहरण करण्यात व्यस्त आहेत. बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हाच जुना तमाशा पाहायला मिळाला. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील सुप्त संघर्ष पेटलेला असतानाच, आता चक्क मंजुरीसाठी आलेल्या ठरावात फेरबदल केल्याच्या कारणावरून स्वच्छता सभापती आणि उपनगराध्यक्ष यांच्यात सभागृहातच जोरदार खडाजंगी रंगली. विरोधक शांतपणे या अं अंतर्गत नाट्याचा आनंद घेत असताना, सत्ताधाऱ्यांच्याच गोंधळामुळे पालिकेची सभा मात्र चांगलीच गाजली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com