esakal | केसांवर फुगे नव्हे, मिळतात भांडी! बेरोजगारांना मिळतोय रोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

hairs

केसांवर फुगे नव्हे, मिळतात भांडी! बेरोजगारांना मिळतोय रोजगार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: केस विंचरताना खाली पडलेले केस महिला टाकून देतात. मात्र, हे खाली पडलेले केस खराब नसतात. याच केसांच्या माध्यमातून अनेकांचा व्यवसाय सुरु आहे. ज्या प्रमाणे जुन्या वस्तू, कपडे देऊन त्या बदल्यात भांडी किंवा पैसे मिळतात, त्याचप्रमाणे केसांची देखील विक्री केली जात आहे. शहरातील बहुतांश कॉलन्या तसेच सोसायट्यांमधील महिला नियमित केस विकत असून त्याला १५० रुपये छटाक प्रमाणे एक हजार दोनशे रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे.
देश - विदेशात महिला व पुरुषांच्या केसांची खूप मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. केसांची मोठी बाजारपेठ आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात केसांची किंमत जास्त आहे. दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी मंदिरात भाविक केसांचे दान करतात. या केसांचा लिलाव करून त्यांची विक्री केली जाते. दरम्यान, या केसांच्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरु झाला आहे. याद्वारे अनेकांना रोजगार देखील मिळत आहे. ग्राहकांकडून कमी किंमतीत केस खरेदी करायचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ते तिप्पट किंमतीने विक्री करायचे हा पैसे कमवण्याचा मार्ग आहे. दर्जानुसार व लांबीनुसार केसांची किंमत ठरते. किमान आठ ते बारा इंची केसांना चांगला दर मिळतो. कमी लांबीच्या केसांना कमी दर दिला जातो. काही ठिकाणी तर या केसांच्या बदल्यात भांडी देखील दिली जात असल्याचे बघायला मिळत आहे.

हेही वाचा: Marathwada Corona Update: मराठवाड्यात ३४० कोरोना रुग्णांची वाढ

यासाठी होतोय वापर
केसांपासून बनवलेले विग महागडे असून, त्याचा मोठा व्यवसाय आहे. तसेच कृत्रीम दाढी, मिशा, अंबाडा आणि गंगावन बनवून त्यांची विक्री चढ्या दरात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केसांच्या विगला चांगली किंमत मिळते, असे व्यावसायिक संतोषकुमार मणियार यांनी सांगितले.

हेही वाचा: आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार

मोठी आर्थिक उलाढाल
काही महिला व पुरुष मंडळी झोपडपट्टीत केस गोळा करण्यासाठी फिरतात. महिला, गृहिणींकडून दररोज विंचरताना कंगव्यात अडकलेले केस गोळा करून ठेवतात. ते खरेदीसाठी आलेल्या महिला-पुरुषांना देतात. त्या बदल्यात एखादे भांडे, मुलांसाठी खेळणी, फुगे, गृहोपयोगी वस्तू देतात. पुढे या केसांची खरेदी दुसरे व्यापारी करतात. नंतर ते केस स्वच्छ धुवून व त्यावर रासायनिक फवारणी करून छाटणी करतात. त्यानंतर दर्जा व लहान मोठी साईज बघून वेगळे ठेवतात. पुढे त्या केसांची देश-विदेशात विक्री केली जाते. त्यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचेही संतोषकुमार मणियार यांनी सांगितले.

loading image