क्लिनरला ट्रकचा जोराचा धक्का, टायरखाली आल्याने मृत्यू

अविनाश काळे
Thursday, 24 September 2020

उमरगा शहरातील वळण रस्त्याच्या कॉर्नरला काळ्या मारुतीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने क्लिनरचा जागीच मृत्यु झाला. गुरुवारी (ता.२४) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरातील वळण रस्त्याच्या कॉर्नरला काळ्या मारुतीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने क्लिनरचा जागीच मृत्यु झाला. गुरुवारी (ता.२४) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलला घेराव, आंदोलकांनी दिल्या घोषणा

या घटनेविषयी मिळालेली माहिती अशी,  सोलापूर येथून हैदराबादच्या दिशेने धावणारा ट्रक उमरगा शहराच्या वळण रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून क्लिनरला टायरातील हवेची तपासणी करण्यासाठी सांगितले. क्लिनर इराण्णा विठ्ठल जवळगे (वय ३१, रा.मंठाळ, ता.बसवकल्याण) टायरातील हवेची तपासणी करीत असताना चालक समद अलिसाब अत्तार (रा. मंठाळ) यांनी अचानक ट्रक चालू केली, तेव्हा क्लिनरला जोराचा धक्का लागल्याने तो टायराखाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. मृताचा भाऊ संतोष विठ्ठल जवळगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

उस्मानाबाद जिल्ह्यात १९४ जण कोरोना पॉझिटिव्ह, आठ रुग्णांचा मृत्यू

पोलिसांनी लावला दुचाकी चोरीचा छडा
उमरगा शहर व परिसरात दुचाकी चोरट्याकडून चोरीचा धडाका सुरू असल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस यंत्रणा चोरट्यांच्या तपासात असताना बुधवारी (ता.२३) दुपारी शहरातील त्रिकोळी रस्त्याला संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या बाबतची माहिती अशी की, प्रवीण शिरगुरे (रा.बालाजी नगर, उमरगा) हे २० सप्टेंबरला पोलिस ठाण्यात त्रिकोळी रोड येथील शेताच्या कडेला दुचाकी हॅन्डल लॉक करून शेतात गेले होते. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने लॉक तोडुन दुचाकी चोरून नेले. श्री.शिरगुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा तपास सुरु असताना बुधवारी दुपारी आकाश देवीदास लोखंडे (रा. दगडधानोरा, ता.उमरगा) हा त्रिकोळी रस्त्यावर संशयितरित्या दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेली दुचाकी ही लपवून ठेवलेली काढुन दिली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaner Died In Truck Accident Osamanabad News