esakal | Jalna :प्रसिद्ध राजुरेश्‍वर मंदिर परिसरात साफसफाई
sakal

बोलून बातमी शोधा

JALNA

प्रसिद्ध राजुरेश्‍वर मंदिर परिसरात साफसफाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्‍वर महागणपती मंदिर गुरुवारी (ता.सात) प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांसाठी खुले होणार आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.पाच) मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली.

गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या राजुरेश्‍वर मंदिराची दारे भाविकांसाठी गुरुवारी खुली होत असली तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावलीही संस्थान प्रशासनाने जाहीर केली आहे. यात गर्भवती, आजारी, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना नागरिकांना मंदिरात प्रवेश असणार नाही. याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

मंदिराच्या परिसरात भाविकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे. विनामास्क आढळणाऱ्या व्यक्तींना दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मंदिर परिसरात थुंकण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. डिस्टन्सिंगचेही पालन भाविकांना करावे लागणार आहे, असे संस्थानचे अध्यक्ष, अधीक्षकांनी कळविले आहे. दरम्यान, मंगळवारी मंदिर परिसराची संस्थानातर्फे साफसफाई करण्यात आली.

भाविकांसाठी नियमावली

  1. गर्भवती, आजारी, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना नागरिकांना नसणार प्रवेश

  2. लसीकरण पूर्ण केलेल्यांना प्रवेश प्राधान्य

  3. मास्कचा वापर अनिवार्य

  4. मंदिर परिसरात थुंकण्यास सक्त मनाई

loading image
go to top