मुलांना नग्न करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ लोहारामध्ये बंद

निळकंठ कांबळे
बुधवार, 20 जून 2018

लोहारा (उस्मानाबाद) : वाकडी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील दोन दलित मुलांना नग्न करून केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २०) मातंग समाजाच्या वतीने लोहारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

वाकडी येथे विहिरीत पोहण्याच्या कारणावरून मातंग समाजाच्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करून त्यांनी नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेचा शहरातील विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

लहुजी शक्ती सेनेने लोहारा शहर बंदची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यात दिवसेंदिवस दलितावरील अत्याच्यारांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दलितांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने कठोर उपायोजना कराव्यात, वाकडी येथील केलेले कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे, अशा विकृत कृत्य करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी दीपक रोडगे, रवी पवार, मारूती रोडगे, बालाजी कसबे, अभिजित सगट, श्याम रोडगे, श्रीपती सुरवसे, अक्षय रोडगे, सुशील रोडगे, संदीप रोडगे, लखन रोडगे, शिवराज कांबळे, बंडू वाघमारे, अमोल रोडगे, बाळू वाघमारे, लक्ष्मण सगट यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: close down in lohara for beating 2 boys