विशेष रेल्वे बंद करण्याचा घातला घाट, प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rly

मराठवाड्यातून सध्या धावणाऱ्या विशेष आणि दिवाळी फेस्टिवल रेल्वेपैकी काही रेल्वेच्या फेऱ्या नियोजित केलेल्या तारखेआधी बंद केल्या जाणार असल्याचे पत्र बुधवारपासून सोशल मिडीयावर रेल्वेच्या अभ्यासक, सदस्य, अधिकाऱ्यांचा समावे असलेल्या ग्रुपमध्ये फिरत आहे. यामुळे आधीच अन्याय सहन करणाऱ्या प्रवाशांना दिवाळीची गोड भेट देण्याएवजी विशेष रेल्वे बंद करण्याचा घाट घातला आहे. एकीकडे रेल्वेचे आरक्षण पुर्ण झाल्याने जागा मिळत नसल्याची बाब समोर येत असताना प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.

विशेष रेल्वे बंद करण्याचा घातला घाट, प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण

sakal_logo
By
राजन मंगरुळकर

नांदेड ः मराठवाड्यातून सध्या धावणाऱ्या विशेष आणि दिवाळी फेस्टिवल रेल्वेपैकी काही रेल्वेच्या फेऱ्या नियोजित केलेल्या तारखेआधी बंद केल्या जाणार असल्याचे पत्र बुधवारपासून सोशल मिडीयावर रेल्वेच्या अभ्यासक, सदस्य, अधिकाऱ्यांचा समावे असलेल्या ग्रुपमध्ये फिरत आहे. यामुळे आधीच अन्याय सहन करणाऱ्या प्रवाशांना दिवाळीची गोड भेट देण्याएवजी विशेष रेल्वे बंद करण्याचा घाट घातला आहे. एकीकडे रेल्वेचे आरक्षण पुर्ण झाल्याने जागा मिळत नसल्याची बाब समोर येत असताना प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. 

साधारणतः मागील महिन्यात २३ ऑक्टोबरपासून मराठवाड्यातील प्रवाशांसाठी नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड, धर्माबाद-मनमाड, मनमाड-धर्माबाद, काचिगुडा-नारखेड, नारखेड-काचिगुडा, अकोला-काचिगुडा, काचिगुडा-अकोला यासह किनवट-मुंबई या रेल्वेच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या. यातील बहूतांश रेल्वेच्या आरक्षणाची दररोजची स्थिती वेटिंग किंवा आरएसी अशीच आहे. 

हेही वाचा - मुंडे म्हणजे भाजप हे माझ्या डोक्यातून कधीच पुसले जाणार नाही...

२४ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याच रेल्वेत आरक्षण उपलब्ध नाही  
अगदी सध्याची दिवाळी तोंडावर असताना २४ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याच रेल्वेत आरक्षण उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तरी प्रवासी घटले असा निष्कर्ष काढत ह्या रेल्वेच्या विशेष फेऱ्या बंद केल्या जाणार असल्याचे पत्र रेल्वे विभागाने काढले आहे. त्याला अद्याप अधिकृत दुजोरा दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद, नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही.    

हेही वाचा - रमेश पोकळे भाजपचा सच्चा कार्यकर्ता, त्याची समजूत काढण्यात यश येईल..

या रेल्वे होणार रद्द
नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड ह्या २३, २४ नोव्हेंबरपासून रद्द, धर्माबाद-मनमाड, मनमाड-धर्माबाद ह्या १५ नोव्हेंबरपासून रद्द, काचिगुडा-नारखेड, नारखेड-काचिगुडा ह्या १४, १५ नोव्हेंबरपासून रद्द, अकोला-काचिगुडा, काचिगुडा-अकोला ह्या १६, १७ नोव्हेंबरपासून रद्द केल्या जाणार असल्याचे पत्र निघाले आहे. 

मुंबई-किनवट, किनवट-मुंबई रेल्वे आदिलाबादपर्यंत
मागील महिन्यात सुरु केलेल्या नांदेड-मुंबई रेल्वेला सुरवातीला किनवटपर्यंत तर आता एकाच महिन्यात ही रेल्वे आदिलाबादपर्यंत नेण्याचा विचार विभागाने केला. तसे पत्र गुरुवारी व्हायरल झाले आहे. १४ नोव्हेंबरपासून ही रेल्वे आदिलाबाद-मुंबई अशी दररोज धावणार आहे.  


अधिकाऱ्यांचा सतत मराठवाड्यावर अन्याय 
रेल्वे अधिकारी आणि ट्रॅव्हल लॉबीच्या संगनमताने मराठवाड्यातील हा प्रकार करण्यात आला आहे. सध्या रद्द करण्यात येणाऱ्या रेल्वेला ३० टक्के प्रवाशी मिळत आहे असे दाखविले जात आहे. पण प्रत्यक्षात सर्व टिकीट विकल्या गेले आहेत. मग हा प्रकार कशामुळे घडत आहे, ह्याचा सर्वांनी जाब विचारणे गरजेचे आहे. 
- प्राचार्य सुरेश नाईकवाडे, मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघ, सचिव. 

loading image
go to top