
Omerga News
Sakal
महेश मोटे
मुरूम : आलूर, ता. उमरगा येथे सलग दोन दिवसापासून बुधवारी (ता. १०) रोजी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान व गुरुवारी (ता. ११) रोजी पहाटेच्या सुमारास आलूर शिवारात अक्षरशः ढगफुटी होऊन उडीद, सोयाबीन, तुर, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तीन तास मुसळधार पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांनी रानावर काढून टाकलेले उडीद, सोयाबीनची पिके अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांचे शेतबंधारे फुटुन मोठ्या प्रमाणावर सुपीक माती वाहून गेली आहे. काही शेतीला तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे.