esakal | दुष्काळी मराठवाडा बनतोय ढगफुटीचा प्रदेश!
sakal

बोलून बातमी शोधा

cloudburst

दुष्काळी मराठवाडा बनतोय ढगफुटीचा प्रदेश!

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: गेल्या काही वर्षात मॉन्सूनचा पॅटर्न बदलत असल्याने मराठवाड्याची दुष्काळी प्रदेश ही ओळख मागे पडून मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश बनत आहे. मात्र, येथे ढगफुटीची अचूक माहिती देणारी कुठलीच यंत्रणा नाही. यासाठी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील ढगफुटीने होणारी जीवितहानी आणि शेतीचे नुकसान टाळण्यासाठी मराठवाड्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तर उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात एक्स बॅंड मोबाईल डॉप्लर रडार कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत भौतिकशास्त्रज्ञ, हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठवाड्यात गेल्या दहा वर्षात पाऊस अधूनमधून सरासरी ओलांडतो. गेल्या वर्षी मराठवाड्यातील पाऊस सुमारे दोनशे टक्के इतका वाढला असून यावर्षी देखील त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ व हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की सध्या महाराष्ट्रात विदर्भासाठी नागपूर इथे, पश्चिम महाराष्ट्रासाठी आधी पुण्यात असलेले रडार कृत्रिम पावसाचे प्रयोग व ढगांच्या अभ्यासाच्या निमित्ताने सोलापूर व महाबळेश्वरला हलविले तर कोकणासाठी मुंबई येथे एक असे चार डॉप्लर रडार आहेत. शिवाय गोवा येथील रडार कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अचूक माहिती देते. मात्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरीकांचे जीव वाचवण्यासाठी व शेतीचे नुकसान कमी करण्यासाठी ढगफुटींची सूचना देण्यासाठी कुठलीही रडार यंत्रणा नाही.

हेही वाचा: MPSC: 'नुसतीच घोषणा नको, अंमलबजावणी करा'

मराठवाड्यासाठी हवे पिंपळदरीत रडार
प्रा. जोहरे म्हणाले, की मान्सून पॅटर्न बदलल्याने मराठवाडा दुष्काळी प्रदेश न राहता आता ढगफुटींचा प्रदेश बनलाय. गेल्या वर्षी मराठवाड्यातील पाऊस सुमारे दोनशे टक्के इतका वाढला असून या वर्षी देखील त्यात अजून भर पडत तो सरासरीच्या काही पटीने वाढेल. उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण वाढले असून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वितरण बदलले आहे. वाढलेला पाऊस आणि ढगफुटी यांची होण्याआधी नागरिकांना माहिती मिळावी तसेच जिवित व वित्तहानी कमी व्हावी यासाठी मोबाईल एक्स बॅंड रडार औरंगाबादला सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे अंजिठा लेणीजवळ बसवणे गरजेचे आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात चांदवड तालुक्यातील चंद्रेश्वर डोंगरावर हे रडार बसविणे आवश्यक आहे.

मराठवाड्यात गेल्या दहा वर्षातील पाऊस (मिलीमीटरमध्ये )

वर्ष..........सरासरी पर्जन्यमान.......प्रत्यक्षात झालेले पर्जन्यमान.....टक्केवारी
............................
२०११........७७९.......................६५४.६..............................८४
२०१२........७७९.......................५३८.२८...........................६९
२०१३...........७७९....................८५४.३७..........................१०९
२०१४..........७७९....................४१४.०३.............................५३
२०१५..........७७९....................४३३.६४.............................५६
२०१६..........७७९....................८७९................................११३
२०१७........७७९......................६७३.०८...........................८६
२०१८........७७९......................५०१.७४..........................६४
२०१९...........७७९..................७७०.६७...........................९९
२०२०...........७७९..................९५१.०५..........................१२७
(स्त्रोत - विभागीय आपत्ती व्यवस्थापन)
-------------------------------------------------------------------

loading image