
Maharashtra CM Devendra Fadnavis visited Beed: आमदार सुरेश धस यांचा बीड जिल्ह्यातील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खुंटेफळ सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी येथे आले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित होत्या, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे गैरहजर होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा होता, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे या दौऱ्याकडे लक्ष लागले होते.