भर पावसात लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा

cm.jpg
cm.jpg

लातूर : आमच्या महाजनादेश यात्रेबरोबर वरुणराजचाही प्रवास सुरु आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आणि आता लातुरात आमच्याबरोबर वरूणराजाचे आगमन झाले आहे. आता इथून पुढे आम्ही मुंबईला जाऊ; पण वरुणराजाने इथेच मुक्काम करून यथेच्छ बरसावे, अशी माझी प्रार्थना आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "वरूणराजा'कडे साकडे घातले. लातूरकारांना उजनीचे पाणी मिळाले पाहिजे, म्हणून आमची तयारी सुरू झाली आहे. यासाठी 600 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. ३१) लातूर जिल्ह्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी सुरवातीला अहमदपूर, उदगीर येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांची लातुरातील टाऊन हॉलच्या मैदानावावर रात्री सभा झाली. पाऊस असतानाही सभेला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. या वेळी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी खासदार सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, महापौर सुरेश पवार, शैलेश लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, "आम्ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात्रा काढायला सुरवात केली. पण आमच्या यात्रेला मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेला मंगल कार्यालयही भरत नाही, अशी स्थिती आहे. कारण १५ वर्षे सत्तेत राहून त्यांना सत्तेची मुजोरी, मग्रुरी आली होती. त्यांनी सामान्य माणसाचे अजिबात कल्याण केले नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवले.

पुढचे २० वर्षे यांना सत्ता काही मिळत नाही. विरोधी पक्षातच बसायचे आहे. पण ते लोक अजूनही सुधरले नाहीत. आम्हाला जनतेने हरवले नाही तर इव्हीएम मशिन हरवले म्हणत आहेत." २००४ ते १४ या दहा वर्षातील सगळ्या निवडणूका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. त्या वेळी इव्हीएम मशिन चांगले होते. आत्ताच कसे वाईट झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री म्हणाले...
- मोदीजींनी निवडणूकीत विरोधकांना धूळ चारल्याने ते इव्हीएमला दोष देत आहेत
- दोष ईव्हीएममध्ये नाही; विरोधकांच्या खोपडीत झाला आहे.
- शेतकऱ्यांना पीक विमा न देण्याऱ्या कंपन्यांना सोडणार नाही. त्यांना कोर्टात खेचणार.
- मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. वॉटर ग्रीड प्रकल्प पूर्ण करणार.
- महाराष्ट्राला देशात पहिल्या स्थानावर आणणार. सर्वप्रकारे महाराष्ट्राला पुढे आणणार.
- हे सरकार तुमचे आहे. गरिबाचे आहे. आपल्याला वैभवशाली महाराष्ट्र बनवायचा आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com