
बीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासासाठी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ३१) दिले. दरम्यान, मुंडे कुटुंबीयांनी मुंबईत फडणवीसांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.