

CM Gram Samruddhi Abhiyan: Assessment Team from Ahilyanagar to Visit Ardhapur
अर्धापूर : राज्यात राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानात सहभागी गावांची पाहणी करण्यात येणार आहे.या अभियानांत अर्धापूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना सहभाग घेतला होता.या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पंचायत समितीचे पथकं दोन मे ते सहा मे या काळात येणार आहे.या अभियानांतर्गत ग्रामविकासाला खूप मोठी चालना मिळाली असून गावांचा विकास सध्य करता आला आहे.तसेच सहभागी ग्रामपंचायतींमध्ये विकास कामां बाबत स्पर्धा लागली आहे.या अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींना तालुका ,जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांनी दिली.