विकास योजना पोहोचविण्यासाठी भाजप कटिबद्ध : योगी आदित्यनाथ

विलास शिंदे
Thursday, 10 October 2019

विकास योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी सेलू (जि. परभणी) येथे गुरूवारी (ता. 10) केले.

सेलू : गेल्या पाच वर्षांपूर्वीची देशाची स्थिती काय होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात देशात झालेला विकासामुळे देश जगामध्ये अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानी पोहचला. विकास योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी सेलू (जि. परभणी) येथे गुरूवारी (ता. 10) केले.

पाथरी रस्त्यावरिल बोर्डीकर मैदनावर महायुती भाजपाच्या जिंतूर—सेलू विधानसभेच्या उमेदवार मेघना साकोरे—बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभे प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,महायुतीच्या उमेदवार  मेघना साकोरे— बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, उप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, महामंत्री शशीकांत देशपांडे,तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर, विलास गिते, सुखानंद कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोदींच्या नेतृत्वाखाली काश्मीर मधिल ३७० कलम हाटविला. त्यामुळे आतंकवाद, नक्षलवाद नियंत्रणात आला.भविष्यात देशातून आतंकवाद, नक्षलवाद समुळ नष्ट होणार असल्याचे योगी यांनी स्पष्ट केले.महाराष्र्टात जेंव्हा अनेक भागात पुरवृष्टी झाली होती.त्यावेळी काॅग्रेसचे राहूल गांधी इटलीला गेले होते. असा टोलाही राहूल गांधी यांना लगावला. देशात सर्वांपर्यंत विकास योजना पोहचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध आहे. मोदींच्या नेतृत्वाची देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या समस्येचे निराकरण करणारा आमदार हवा असेल तर मेघना साकोरे—बोर्डीकर यांच्या सारख्या उच्चशिक्षित उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते भाजप प्रेमी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस बंदोबस्त चोख होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP CM Yogi Adityanath rally at Parbhani