Narali Pournima Special : सणासुदीमध्ये नारळ खातंय भाव! मागणी वाढली; खोबरे, तेल अन् नारळ पाण्याचा भाव झाला दुप्पट,नारळी पौर्णिमा विशेष
Coconut Price Hike in Maharashtra : सणासुदीच्या काळात लातूर जिल्ह्यात नारळ, शहाळे, खोबरे व तेल यांची मागणी वाढली असून त्यांचा भाव दुपटीने वाढला आहे. प्रयागराज महाकुंभातही नारळाचा मोठा वापर झाल्याने मागणी वाढली आहे.
लातूर : सध्या सणासुदीचे दिवस असून याकरिता नारळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पण, यावर्षी नारळाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती आहे. याचा परिणाम नारळ, शहाळे, खोबरे, खोबरे तेल या सर्वांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे.