esakal | चोऱ्या रोखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, दिवाळीनिमित्त जालना पोलिसांची मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Image 2020-09-03 at 11.23.32

दिवाळीनिमित्त अनेक जण घराला कुलूप लावून गावी जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरफोड्यांसह चोऱ्या होण्याची शक्यता अधिक असते.

चोऱ्या रोखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, दिवाळीनिमित्त जालना पोलिसांची मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : दिवाळीनिमित्त अनेक जण घराला कुलूप लावून गावी जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरफोड्यांसह चोऱ्या होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पुढील तीन दिवस जालना पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यातील अठरा पोलिस ठाण्यांअंतर्गत नाकाबंदीसह रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले जणार आहे. त्याची सुरवात शुक्रवारपासून (ता.१३) झाली आहे.दिवाळीनिमित्त अनेक जण गावी जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे घरांना कुलूप असते.

Diwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक

या काळात चोरटे सक्रिय होण्याची शक्यता असते. चोऱ्या, घरफोड्यांची शक्यता असते. असे प्रकार होऊ नयेत यासाठी जालना पोलिस प्रशासनाकडून आजपासून पुढील तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाकाबंदीवरही भर दिला जाणार आहे. त्यानुसार आज शहरातील चार तर जिल्ह्यातील इतर सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी करण्यात आली होती.

फरारींचाही शोध घेणार
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान रेकॉर्डवरील परंतु फरारी संशयितांचा शोध घेतला जाणार आहे. रात्रीच्या गस्तीतही वाढ केली जाणार आहे.


दिवाळीनिमित्त जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत पुढील तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. यादरम्यान रेकॉर्डवरील फरारी आरोपींचा शोध घेणे, काही वस्त्यांची तपासणी, जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदीही केली जाणार आहे.
- सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना

Edited - Ganesh Pitekar