esakal | Diwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक
sakal

बोलून बातमी शोधा

Vasubaras

दिवाळीला आता आधुनिकतेचा साज चढला आहे. म्हणूनच शेतातच घर असलेल्या शेतकऱ्यांची पारंपरिक दिवाळी कशी असायची, याचा हुबेहुब देखावा करून छायाचित्रकाराने शेतकऱ्यांसह वसुबारसचा जिवंत देखावा करत दिवाळी साजरी केली.

Diwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि.बीड)  : दिवाळीला आता आधुनिकतेचा साज चढला आहे. म्हणूनच शेतातच घर असलेल्या शेतकऱ्यांची पारंपरिक दिवाळी कशी असायची, याचा हुबेहुब देखावा करून छायाचित्रकाराने शेतकऱ्यांसह वसुबारसचा जिवंत देखावा करत दिवाळी साजरी केली.वसुबारस म्हटले, की गाय-वासराचे चित्र समोर उभे राहते. शेतकऱ्यांचे प्रमुख धन ही गाय असते. दिवाळीच्या प्रारंभी वसुबारसेला सर्व शेतकरी गाईची पूजा करतात, 'दिन,दिन दिवाळी गाई, म्हशी ओवाळी असे म्हणत..गाईची आरतीची केली जाते. ही पारंपारिक दिवाळी, आता लोप पावत चालली आहे. म्हणूनच छायाचित्रकार सुशील भोसले यांनी शेतकरी अर्जुन काटे यांच्या शेतावर पारंपारिक वसुबारसेचा देखावा तयार केला.

Lakshmi Puja Muhurat : आज लक्ष्मीपूजन; घरोघरी लगबग, व्यापाऱ्यांचे चोपडीपूजन

असा केला देखावा
छायाचित्रकार श्री. भोसले यांनी हा देखावा साकारला. त्यांच्या पत्नी गीता यांनी गोठ्यासमोर सुंदर रांगोळी काढली. बैलगाडीत त्यांचा मुलगा ओंकार हा शेतकरी म्हणून बसला तर मुलगी योगेश्वरी व पुतणी सई यांनी तुळशीची पुजा केली. आई सुनंदा भोसले या गोठ्यासमोर कापसाच्या वस्त्रमाळ करत बसल्या. बाजुलाच दावणीला म्हैस बांधलेली, गाय आपल्या वासराला चाटत माया करत आहे. आंब्याच्या पानाचे तोरण, झेंडूच्या माळांची सजावट, विद्युत दिव्यांचा व तेजोमय तेलवातीच्या पणत्या हा सर्व कृत्रिम नव्हे तर जिवंत देखाव्याने वसुबारसेचे चित्र उभे केले. यासाठी हौशी छायाचित्रकार विजय लोखंडे, नंदकिशोर देशमाने, अविनाश ओव्हाळ, रामलिंग खके यांनी त्यांना मदत केली.


सध्याच्या दिवाळीवर आधुनिकतेचा पगडा असल्याने लोक पारंपारिक दिवाळी विसरत आहेत. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी कशी असते हे देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याला मराठमोळा साज (लुक) दिला आहे.
सुशील भोसले, छायाचित्रकार


माझ्या शेतावर दिवाळीची अशी वसु बारस कधीच साजरी झाली नाही. तो आनंद श्री. भोसले यांनी मिळवून दिला. यामुळे दिवाळीच्या पणत्यांच्या प्रकाशात माझे शेत शिवार उजळले.
अर्जुन काटे, शेतकरी

 

Edited - Ganesh Pitekar