हिंगोलीकरांना दिलासा; चौघांचे अहवाल निगेटिव्ह 

korona
korona
Updated on

हिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या चार कोरोना संशयितांच्या स्‍वॅब नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी (ता. तीन) प्राप्त झाला असून चौघांचाही अहवाल निगेटिव्ह आला असून इतर आठ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

जिल्‍हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डात कोरोना संशयित १३ रुग्ण दाखल झाले आहेत. यातील एका रुग्णाचा (वय ४९) अहवाल गुरुवारी (ता. दोन) पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह सर्वांनीच दक्षता घेण्यास सुरवात केली होती. 

आयसोलेशन वार्डात १३ रुग्ण दाखल
 

दरम्‍यान, जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल असलेल्या १३ रुग्णांपैकी चौघांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून चौघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. इतर आठ संशयित कोरोना पॉझिटिव्ह आसलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या सर्वांचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रलंबित आहे. सध्या होम क्‍वॉरंटाइन ठेवण्यात आलेल्या नागरिकांत दोघांचा समावेश आहे.

कळमनुरीतील युवकाचे मोबाइल डिटेल्स मागविले

कळमनुरी : येथील एक युवक दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून शहरात परतल्याच्या चर्चेनंतर गुरुवारी (ता. दोन) पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युवकाच्या निवासस्थानी भेट देऊन आरोग्य तपासणी केली. त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारत घरामध्येच विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिसांनी युवकाचे दोन महिन्यांचे मोबाइल डिटेल्स मागविले आहेत.

दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची चर्चा

शहरातील विकासनगर भागातील युवक दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या घरी परतल्याची चर्चा या भागात गुरुवारी झाली. ही चर्चा संपूर्ण शहरत पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विकासनगर भागातील नागरिकांनी पोलिस व आरोग्य विभागाला याची कल्पना दिली. 

पोलिस अधिकारी, कर्मचारी पोचले युवकाच्या घरी 

या प्रकाराची कल्पना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही देण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाचे एक पथक व पोलिस अधिकारी, कर्मचारी युवकाच्या घरी पोचले. त्यांनी संबंधित युवकाकडे मागील काही दिवसांत शहरात नसल्याबाबत विचारणा केली. या काळात तो कुठे गेला होता, या बाबत चौकशी केली. मात्र, उपस्थित नागरिक व पोलिस विभागाचे यावर समाधान झाले नाही. 

विलगीकरण करून ठेवण्याचा सल्ला

आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित युवकाची आरोग्य तपासणी करून त्याच्या हातावर होम क्‍वॉरंटाइनचा शिक्का मारून घरीच विलगीकरण करून ठेवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, युवक मागील काही काळ ज्या ठिकाणी वास्तव्याला होता तेथील सरपंचाने हा युवक येथे वास्तव्यास असल्याचे पत्र दिले आहे. यानंतरही पोलिस विभागाने संबंधित युवकाच्या मोबाइलचे दोन महिन्यांचे कॉल डिटेल्स मागविले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com