आरं देवा... आमचा कधी पांग फिटलं !

bhokar 3.jpg
bhokar 3.jpg


भोकर, (जि. नांदेड) ः कृषी प्रधान देशात शेतीव्यवसायावर नेहमीच संक्रांत येत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्याने अशात शेती उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. जगात सध्या कोरोना विषाणूंमुळे हाहाकार माजला आहे. संचारबंदीने बाजारपेठ ठप्प झाली आहे. शेतीमधील पीक जागच्याजागी सडून जात आहे. भाजीपाला चक्क फेकून दिला जातो आहे. देवा आमचा कधी पांग फिटल...अशी आर्त टाहो हवालदिल झालेला शेतकरी फोडत असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा -  पोलिसांच्या अनोख्या कारवाईने नागरिक हिरमुसले
देशाचा आर्थिक कणा म्हणून शेतकऱ्यांची ओळख आहे. शेती सुजलाम सुफलाम झाली तर बाजारपेठ खऱ्या अर्थाने फूलून येते. देशातील जनता गुण्यागोविंदाने नांदते. शेतीसाठी लागणारे पाणी तीतकेच महत्त्वाचे आहे. परंतू मागील अनेक वर्षांपासून कृषी प्रदान देशात बळिराजावर आर्थिक संकटाचे काळेकुट्ट ढग घोंगावत आहेत. निर्सगही हळूहळू आपले नखे काढू लागल्याने शेतकऱ्यांच्या सुखी संसाराचे पूर्ण मातेरे होतांना दिसते आहे. श्रूतूचक्र बदलून गेल्याने शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतकरी नाईलाजाने आत्महत्या करून मोकळे होताना दिसत आहेत. शासन केवळ रडणाऱ्याची आसवे पूसून धीर देत आहेत. मरण स्वस्त आणि जगणं कठीण होते चालले आहे. अशा महाभयंकर संकटातून कसंबसे सावरत कुटुंबातील चार तोंडी घास भरवत असताना पुन्हा देशात कोरोना विषाणूंमुळे हाहाकार माजला आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. शासनाने अशा प्रसंगी सावधगीरी बाळगून धीर देण्याचे काम चोखपणे बजावत आहे.


देशात संचारबंदी
कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून जगात अनेक उपाय योजना केली जात आहे. तरी आटोक्यात येत नाही. दिवसेंदिवस विषाणुमूळे रूग्ण वाढत असल्याने भारतात २१ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी अनेक महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. नागरीक आपल्या घरातच बसून आहेत. वीशेष म्हणजे शेती व्यवसाय पुरती कोलमडून गेली आहे. भोकर शहरालगत असलेल्या गावात बहुतांशी शेतकरी भाजीपाला काढून आपला उदरनिर्वाह चालवतात. बाजारपेठ बंद झाल्याने भाजीपाला शेतात सूकून जात आहे. अनेक शेतकरी भाजीपाला कुणी घेत नसल्याने रस्त्यावर फेकून देत आहेत.


आमचा वाली कोण
नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू क्षेत्रातील आहेत. एकमेक निसर्गाचा त्यांना मोठा आधार मिळतो, पण निसर्ग कोपल्याने मोठी आर्थिक हानी होत आहे. शासन तूटपूंजी मदत देऊन मोकळे होत आहेत. आता कोरोना विषाणूंमुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे शेतिव्यवसायावर संक्रांत आली आहे. आमच्या नशिबात असंच आई का जीण सटवायीन लीहल आहे. चीला पीलाच पोट कसं भरणार. संकटाची जणु मालीकाच सुरू झाली आहे. आमचा पांग कधी फीटणार...कुणी आमचा वाली आहे का ? असे अनेक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ- वासून उभे राहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com