कोरोना महामारीत रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाने १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याच्या निर्णय घेतलाय. राज्य शासनाने या काळात संचारबंदी तसेच जमावबंदी आदेश जारी केले आहेत. पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संचारबंदी काळात उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी अनोखा उपक्रम राबविला आहे.
पोलिसांच्या अनोख्या कारवाईने नागरिक हिरमुसले
बारड, (ता.मुदखेड, जि.नांदेड) ः पोलिस प्रशासनाने संचारबंदीच्या काळात उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ‘जय हिंद’चा अनोखा उपक्रम राबवला असून स्वागतार्य कारवाईतून नागरिक हिरमुसले असून दंडुके यानंतर शहाण्याला शब्दाचा मार या माणुसकीच्या कारवाईतून नागरिकांनी घराचा बाहेर पडण्याचा निर्धार केला आहे.
नागरिकांसाठी अनोखा उपक्रम
कोरोना महामारीत रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाने १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याच्या निर्णय घेतलाय. राज्य शासनाने या काळात संचारबंदी तसेच जमावबंदी आदेश जारी केले आहेत. पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संचारबंदी काळात उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी अनोखा उपक्रम राबविला आहे.
‘जय हिंद’चा आदर
सुरवातीस नागरिकांना पांगविण्यासाठी तसेच संचारबंदीची नियमावली गाव पातळीवर प्रभावी राबविण्यासाठी दंडुका मोहीम राबविली होती. परंतु यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने समाजाचा शत्रू आहे असे पोस्टर लावून वेगळी कारवाई केली आहे. यानंतर आता पोलिसांनी संचार बंदीच्या काळात उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी ‘जय हिंद’चा आदर करत हळदी कुंकवाने स्वागत करून स्वागत कारवाई केल्याने नागरिक मात्र हिरमुसले आहेत. ग्रामस्थांनी केंद्र सरकारचा आदेश तसेच राज्य सरकारच्या संचारबंदीच्या कारवाईच्या आदेशाचे पालन करण्यासाठी घरातच राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रस्त्यावर कोणीही फिरकत नसून सर्वत्र शुकशुकाट दिसून आला आहे.
हेही वाचा - नांदेडला किराणा घरपोच मिळणार, काळजी करु नका...
जगात ‘कोरोना’ सारख्या भयानक महामारी आजाराने थैमान घातले आहे. यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने सर्वतोपरी उपाययोजना आखल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचा हायअलर्ट जारी केला असून यास प्रतिसाद देण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. गावातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. यासोबतच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी गावात किटकनाशक औषधांची फवारणी केली आहे. पोलिस प्रशासनाने गावात १४४ जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. यासोबतच सर्व व्यापाऱ्यांना पान टपरी, हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Web Title: Citizens Were Shocked Unusual Police Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..