esakal | प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये याची दक्षता घ्या असा इशारा खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी ता. १४ आयोजित दिशा समितीच्या बैठकीत दिला आहे.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली . यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, संसद आदर्श ग्राम योजना प्रधानमंत्री आवास योजना या सह इतर योजनांचा आढावा घेतला.यावेळी खासदार पाटील व आमदार बांगर यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र हे पंचनामे वस्तुनिष्ठ झाले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा झाला पाहिजे. एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहता कामा नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा सुचना त्यांनी केल्या.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मध्ये सांडस-सालेगाव, बेलमंडळ या पुलाचे बांधकाम मंजूर होऊन सहा महिने झाले तरी अद्यापही निविदा का काढण्यात आली नाही असा प्रश्‍न खासदार पाटील व आमदार बांगर यांनी उपस्थित केला. मात्र यावर संबंधित अधिकारी निरुत्तर झाले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या संथ कामावरून आमदार बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

loading image
go to top