रविना टंडनसह तीन अभिनेत्रींविरुद्ध बीड पाेलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंह आणि फराह खान यांच्याविरोधात बीड येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा या अभिनेत्रींवर आराेप आहे.

बीड -  धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंह आणि फराह खान यांच्याविरोधात बीडमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अद्याप या तक्रारीवरून कुठलाही गुन्हा नोंद नाही. 

एका दूरचित्र वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमात फराह खान, भारती सिंह आणि रविना टंडन यांनी पवित्र असणाऱ्या एका शब्दाबाबत अश्‍लील टिप्पणी केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारअर्जासोबत त्या कार्यक्रमाची व्हिडिओ सीडीही जोडली आहे. धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी या तीनही अभिनेत्रींविरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी अल्फा ओमेगा संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे आशिष शिंदे, अशोक थोरात, अविनाश सरकटे, अमृत सोनवणे, अमोल शिंदे उपस्थित होते. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint against three actresses including Ravina Tandon