अक्षयकुमारच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल  

अक्षयकुमारच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल  

नांदेड : सिने अभिनेता अक्षय कुमार मावळ्यांचे कपडे घालून शिंदेशाही पगडीसह ‘निरमा वॉशिंग पावडर’ची जाहिरात करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी इतिहास घडवला कर्तृत्व सिद्ध केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. जाहिरातीसाठी त्यांची वेषभुषा परिधान करणे मावळ्यांचा अवमान तर आहेच; पण राष्ट्रपुरुषांचाही अपमान असल्याचा अरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हाअधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देवून गुरुवारी (ता. नऊ जानेवारी २०२०) संभाजी ब्रिगेडच्या वतीने वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

काय आहे जाहिरात 
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या बळावर स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य निर्माणासाठी मावळ्यांना रक्त सांडावे लागले हा सुर्यप्रकाशा एवढा सत्य ईतिहास आहे. ‘शिंदेशाही पगडी’ घालून अटकेपार झेंडे फडकावले. शिंदे-होळकरांचा इतिहास देशभर, जगभर अभिमानाने सांगितला जातो. हेच मावळे लढाई करून आल्यानंतर त्यांच्या घरातील महिला (राणी) त्यांना हिनवून बोलतात...असे या जाहिरातीमध्ये दाखवले आहे. मावळे लढाई करून आल्यानंतर कपडे  स्वच्छ करत बसायचे असा त्यांचा त्यामागील संदेश आहे. कपडे धुण्यापुरते वा निरमा विकण्यापुरते ‘मावळे’ व त्यांचे कर्तृत्व उरले का? अशा संतप्त भावना शिवप्रेमींतून व्यक्त होत आहेत.  

जाहिरातीवर बंदीची मागणी 
मावळ्यांच्या वेषभुषेतील प्रसारीत निरमा कंपनीच्या जाहिरातीचे प्रसारन तात्काळ थांबवण्यात यावे. सिने अभिनेते अक्षय कुमार, ‘निरमा’ वॉशिंग पावडरचे मालक व कंपनी आणि आयुष लिमिटेड यांच्यावर राष्ट्रपुरुष, मावळ्यांची बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतिने जिल्हाअधिकारी अरुण डोंगरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  

तीव्र आंदोलनाचा ईशारा 
सिने अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करुन प्रसारीत जाहिरातीवर बंदी आणावी अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष भगवान कदम, सुभाष कोल्हे, अविनाश शिंदे, दिपक भरकड, अभिजीत टाकळे, परमेश्वर पाटील, शहाजी शिंदे,बालाजी सांगवीकर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे, गणेश शिंदे, माणिक मोरे, रोहित धुमाळे, जेजेराव शिंदे, कमलेश कदम, विश्वांभर कदम, चिञांगण लडे, अंकुश कोल्हे , राज पुयड, सुरज पाटील आदींनी दिला आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com