esakal | रेल्वे लाईन दुहेरी करणाचे काम पूर्णत्वास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बुधवारपासून मार्ग वाहतूकीसाठी सज्ज; परभणी ते मुदखेड दुहेरीकरणास चार वर्षांपासून सुरवात

रेल्वे लाईन दुहेरी करणाचे काम पूर्णत्वास

sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा (ता.परभणी): दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने परभणी ते मुदखेड दरम्यान रेल्वे लाईन दुहेरी करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून लहानसहान त्रूटी बुधवार (ता.१८) पर्यंत सर्व पूर्ण होऊन हा मार्ग वाहतूकीसाठी सज्ज होइल, अशी माहिती रेल्वेच्या सुत्रांने दिली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने मुदखेड ते परभणी ८१.४३ किलोमीटर अंतराच्या रेल्वे लाईन दूहेरीकरण करण्याचे काम तीन ते चार वर्षापूर्वी सुरु करण्यात आले होते. सुरुवातीला परभणी ते मिरखेल त्यानंतर मुदखेड ते माळ टेकडी त्यानंतर नांदेड ते लिंबगाव दरम्यान काम पूर्ण करण्यात आले. या कामावर अंदाजे तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मागील एक वर्षापासून लिंबगाव ते चुडावा मिरखेल हे ३१.९३ किलो मीटरचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाला जवळपास शंभर कोटी रुपयांचा निधी खर्च मंजूर करण्यात आला. पूर्णा ते चुडावा या टप्प्यात पूर्णा नदीवरील मोठ्या पुलांसह या मार्गावरील छोटे-मोठे पूलही उभारण्यात आले. 

हेही वाचा -  आमचे जुळले... तुमचे कसे जुळले जरा सांगा की... वाचा कोणा म्हणाले असे

शुक्रवारी दुहेरीकरणाची पाहणी

 मागील १० दिवसांपासून रेल्वेचा मेगाब्लॉक घेऊन सिग्नल दुरुस्ती, पटरी आप आपसात जोडण्याचे, तसेच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आदी दुरुस्तीची कामे हजारों कर्मचार्यांनी दिवसरात्र एक करून पूर्ण केले. शुक्रवारी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सुरक्षा आयुक्त रामकृपाल यादव, विभागाचे व्यवस्थापक उपिंदर सिंघ, रेल्वे स्टेशन मास्तर महेंद्र निकाळजे, मुकेश कुमार मिना आदींच्या उपस्थितीमध्ये या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाची पाहणी करण्यात आली. पहिली रेल्वे सुरक्षा चाचणी घेण्यात आली ही चाचणी यशस्वी होऊन या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील मिळेल का? हे पुढील काही दिवसांत पहावयास मिळेल. या कामात काही त्रूटी आहेत किंवा नाही हे रेल्वे प्रशासनाने मात्र, स्पष्ट केले नाही. 

३१.९३ किलोमीटर चे काम पूर्ण
काही लहानसहान त्रूटी दूर करण्यासाठी मुदखेड ते परभणी दरम्यान ८१.४३ किलोमीटर दुहेरीकरण लिंबगाव -चुडावा-पूर्णा-मिरखेल दरम्यान ३१.९३ किलोमीटर चे काम पूर्ण करण्याकरिता आणि सिग्नलिंगच्या कार्या करिता चार दिवसाचा ब्लॉक मुळे बुधवार (ता.१८) पर्यंत रेल्वे वाहतूकीवर परिणाम होणार आहे.

हेही वाचा - मोबाइल चोरी: सायबर क्राईमची घुसखोरी, अशी घ्या काळजी...

प्रशासनास सहकार्य करावे
या ‘ब्लॉक’मुळे जनतेला होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याकरिता हा लाईन ब्लॉक घेणे अनिवार्य होते, तरी जनतेने रेल्वे प्रशासनास या कालावधीत सहकार्य करावे.
उपिंदर सिंघ, विभागीय व्यवस्थापक,
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड

रेल्वे आता निर्धारित वेळेत धावतील
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे मोठे काम पार पडत आहे. त्याचा आनंद आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे कित्तेक घंटे उशीराने धावणाऱ्या रेल्वे आता निर्धारित वेळेत धावतील. प्रवाशांचा वेळ व मानसिक त्रास त्यामुळे वाचेल. हा मोठा फायदा दुहेरीकरणाचा होणार आहे. मेगाब्लॉक मुळे काही दिवस त्रास झाला. पण, नेहमीचा त्रास वाचणार यामुळे त्याचे काहीही वाटले नाही. या काळात रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र परिवहन महामंडळा समवेत समन्वय ठेवून एसटी ची व्यवस्था करायला हवी होती.
संदीप लोणे , अर्धापूर. प्रवासी

loading image
go to top