esakal | आमचे जुळले... तुमचे कसे जुळले जरा सांगा की... वाचा कोणा म्हणाले असे
sakal

बोलून बातमी शोधा

nanded photo

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी आणि व्हॅलेंटाईन डे असा दुहेरी संगम साधत तरुणाईला लाजवेल अशा प्रेम प्रसंगातील आठवणिंना प्रकट'मुलाखतीतून उजाळा देत असतानाच चक्क मुलाखतकाराचीच मुलाखत घेण्याचा कोचितच प्रसंग आढळतो. सिनेअभिनेता रितेश देशमुख चव्हाण दाम्पत्यांची मुलाखत घेत असतानाच अच्यानक अशोक चव्हाण यांनी आता आमचे जुळले जरा तुमचे कसे जुळले जरा सांगाना म्हणत रितेश देशमुख यांची विकेट घेतली.

आमचे जुळले... तुमचे कसे जुळले जरा सांगा की... वाचा कोणा म्हणाले असे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अभिनेता - अभिनेत्री म्हटले की ग्लॅमर आलेच. मग तो मराठी असो वा हिंदी सिनेमातील हिरो - हिरोईन त्यांची एक झलक बघण्यासाठी चाहते  कुठलाच मोका सोडत नाहीत. तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलिवूडचे फेमस कपल जेनेलिया डिसूजा (देशमुख) आणि मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख शनिवारी नांदेड शहरात शंकरराव चव्हाण जन्म शताब्दी सोहळ्यासाठी येणार म्हटल्याने चाहत्यांनी या कपल्सची एक झलक बघण्यासाठी तुफान गर्दी केली होती. 

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळ्यात ‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमात रितेश देशमुख आणि जेनेलिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेणार होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी आयटीएम आणि यशवंत महाविद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर प्रकट मुलाखत सुरु झाली. मात्र, चाहत्यांना जेनेलिया कुठेच दिसत नव्हती. दिसला तो रितेश देशमुख तरी देखील चाहत्यांनी रितेशकडे बघुन समाधान व्यक्त केले. रितेश देशमुख मंत्री अशोक चव्हाण यांना एक-एक प्रश्न अतिशय खुबीने विचारत होता. प्रश्न उत्तराने मुलाखतीला रंग भरत होता. अशोक चव्हाण बालपण, शाळेतील मित्र, महाविद्यालयीन जीवन, वडिलांच्या जिवनातील कटु गोड अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, प्रेमाला नेमकी कधी भरती आली अशा विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे देत होते.

हेही वाचा- झेडपीच्या अध्यक्ष - माजी उपाध्यक्ष यांच्यात शाब्दीक चकमक

पुढचा प्रश्न कोणता असे म्हणून रसिक प्रेक्षक कंठात प्राण ओतुन मुलाखत ऐकत होते. पुढच्या प्रश्नाचा अंदाज बांधत होते. अभिनेता रितेश देशमुख यांचे प्रश्न आणि त्यावर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबतच अमिता भाभी चव्हाण यांच्या समर्पक उत्तराने मुलाखत पुढे सरकत होती. परंतु, आता आमचे जुळले, तुमचे कसे जुळले जरा सांगाणा म्हणत अशोक चव्हाण यांनी थेट रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची लव्हस्टोरी कशी जुळली असा सवाल रितेश देशमुख यांना करताच चाहत्यांनी शिट्यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा- पत्नीच्या भेटीपूर्वीच सैनिकावर कालाचा घाला

आणि रितेश बोलता झाला
बराच वेळ अभिनेते रितेश देशमुख मंत्री अशोक चव्हाण यांची मुलाखत घेत होते. मात्र, आता मुलाखतीची सुत्रे स्वतः अशोक चव्हाण यांनी आपल्या हाती घेत रितेश देशमुख यांना प्रश्न विचारण्यास सुरु केले होते. यावर रितेश बोलता झाला आणि चाहत्यांना जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचे सुत्र कसे जुळले सांगताना अमेरिकेहून शिक्षण पूर्ण करून आल्याने सिनेमाची आॅफर मिळाली. वडिलांची परवानगी घेत सिनेमाची स्टोरी वाचण्यासाठी हैदराबादला गोले. तुझे मेरी कसम नावाचा सिनेमा होता. यात खुपच रोमॅंटीक सिन होते. त्यामुळे आम्ही खुपच जवळ आलो. मी माझी ओळख करुन दिली तरी, तिने तिन दिवस माला भावच दिला नव्हता. पुढे आम्ही सिन करत खुपच रोमॅंटीक झालो. वीस वर्षापूर्वी तिला गुलाबाचे फुले दिले होते. त्याचे अजून उत्तर आले नाही. यावर रितेश देशमुख यांनी मी वीस वर्षापूर्वी तिला गुलाबाचे फुल दिले होते. पण अजून काही उत्तर आलेच नाही म्हणताच प्रेक्षकात हशा पिकला.
 

loading image
go to top