Latur|उदगीरात चेकअपचे निमित्त करुन कंपाउंडरने केला महिलेचा विनयभंग

सध्या या प्रकरणातला आरोपी फरार असून त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
woman molestation
woman molestationsakal media

उदगीर (जि.लातूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होऊन प्रसूती झालेल्या एका २१ वर्षीय महिलेचा रुग्णालयातील कंपाउंडरने चेकअपचे निमित्त करून ओपीडीमध्ये नेऊन विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या फिर्यादी वरून शहर पोलिस ठाण्यात (Udgir) कंपाउंडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की परिसरातील एक महिला प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिची प्रसूती ही झाली. रविवारी (ता.१२) दुपारी साडेबाराच्या दरम्यान या रुग्णालयातील कंपाउंडर आरोपी सचिन राजमाने याने या प्रसूत झालेल्या महिलेला चेकअप करण्याच्या (Compounder Molests Woman Patient In Udgir Sub District Hospital Latur News) निमित्ताने रुग्णालयातील ओपीडी रूममध्ये नेले. तेथे नेऊन या महिलेचा विनयभंग केला. (Latur)

woman molestation
Aurangabad|रोहयो मंत्री भुमरेंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दूध येते की नाही म्हणून वाईट हेतूने स्पर्श केला अशा आशयाची फिर्याद सायंकाळी पीडित महिलेने दिल्यावरून शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.१३) रात्री अडीचच्या दरम्यान या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक गोरख दिवे, पोलिस उपनिरीक्षक सहदेव खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल करून पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या या प्रकरणातला आरोपी फरार असून त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आणखी एका दुसऱ्या महिलेचाही विनयभंग झाले असल्याची चर्चा सुरू आहे.

woman molestation
लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका, जया बच्चन यांची मोदींवर टीका

मग अशा पीडित किती महिला आहेत ज्यांनी कुटुंबियांना माहिती दिलेली नाही किंवा कुटुंबांनी ती पोलिसांपर्यंत घेऊन गेली नाहीत. याचा तपास होणे गरजेचे आहे. या उपजिल्हा रुग्णालयात अशा अनेक महिलांचा विनयभंग केला गेला असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. यासाठी पीडित महिलांनी पुढे आले पाहिजेत, तरच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे अशी नागरिकांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com