नळ जोडणीसाठी ‘कर’ भरण्याची अट शिथिल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

आताची परिस्थिती पाहता महापालिकेद्वारे स्‍वत:हून एक पाऊल पुढे टाकुन या भागातील मालमत्‍ताधारकांनी नळ कनेक्‍शन घ्‍यावेत. यासाठी तसेच त्‍यांना आताच्‍या परिस्‍थतीमधील आर्थीक भार कमी करण्यासाठी  नविन नळ जोडणीच्‍या अटिमधील मालमत्‍ता कर भरणेबाबतची अट शिथील करून हा मालमत्‍ता कर धारकाने नंतर भरण्‍याच्‍या अटीवर त्‍यांना नविन नळजोडणी देण्‍यात येईल. 
 

  परभणी : परभणी  महापालिकेने नळ जोडणीसाठी आवश्यक असलेली मालमत्ताकर भरण्याची अट शिथिल केली असून आता नागरिकांना मलमत्ताकराचा भरणा न करता न जोडणी दिली जाणार आहे.
महापालिके मार्फत शहरातील सर्व मालमत्‍ता धारकांना नविन पाईपलाईनवर अधिकृतपणे नळ कनेक्‍शन घेण्‍याकरीता यापूर्वीच आवाहन करण्‍यात आलेले आहे. त्‍यानूसार महापालिकेमार्फत मागील दोन महिन्‍यांपासून नळजोडणीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना नविन पाईपलाईनवर नळजोडणी देण्‍यात येत आहे. परंतु, नविन पाईपलाईनवर नळ घेण्‍यासाठी नागरिकांचा अत्‍यल्‍प प्रतिसाद आहे. 
सध्‍या उन्‍हाळ्याचे दिवस असल्‍याने व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पाहता नविनपाईपलाईनवर लवकरात लवकर नळजोडणी होणे आवश्‍यक आहे. जेथे नळाद्वारे पाणीपुरवठ्याची कुठलीच व्‍यवस्‍था नाही, अशा मालमत्‍ता धारकांनी नळजोडणी घेणे अपेक्षीत होते. त्‍यादृष्‍टीने महापालिकेतर्फे प्रयत्‍न करण्‍यात आले व येत आहेत. परंतु, अजुनही त्‍याला म्‍हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.

हेही वाचा - आता मार नाही... थेट कारवाईच..!
परभणी  महापालिकेचे एक पाऊल पुढे 
आताची परिस्थिती पाहता महापालिकेद्वारे स्‍वत:हून एक पाऊल पुढे टाकुन या भागातील मालमत्‍ताधारकांनी नळ कनेक्‍शन घ्‍यावेत. यासाठी तसेच त्‍यांना आताच्‍या परिस्‍थतीमधील आर्थीक भार कमी करण्यासाठी  नविन नळ जोडणीच्‍या अटिमधील मालमत्‍ता कर भरणेबाबतची अट शिथील करून हा मालमत्‍ता कर धारकाने नंतर भरण्‍याच्‍या अटीवर त्‍यांना नविन नळजोडणी देण्‍यात येईल. नागरिकांना आता केवळ नवीन नळ जोडणीचाच खर्च करावे लागेल व ही सवलत  ता. ३१ मे २०२० पर्यंत लागु राहिल, असे पत्रकात म्हटले आहे. त्‍यामुळे शहरातील जुनी पाईपलाईन नसलेल्‍या भागातील नागरीकांना आवाहन करण्‍यात येते की, लवकरात लवकर नविन पाईपलाईन वरती नळ जोडणी करून घ्‍यावी व त्‍यांना होणार त्रास कमी करून घ्‍यावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्‍त रमेश पवार यांनी केले आहे.

 हेही वाचा.... 
 दानशूरांना मदतीचे आव्हान
परभणी : लॉकडाऊनच्या आदेशामुळे बंद झालेल्‍या उद्योग व्‍यवसायातील प्रभावीत झालेले कामगार, परराज्‍यातील विस्‍थापित कामगार व बेघर व्‍यक्‍ती यांचेसाठी निवारागृह, अन्‍न, पाणी, वैद्यकीय देखभाल पालिकतर्फ कली जाणार असून त्यासाठी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे. शासना आदेशानूसार निर्णयानूसार  शहरी भागात तातडीची उपाययोजना करण्‍यासाठी आयुक्‍त यांचे अध्‍यक्षतेखाली आवश्‍यक असलेल्‍या इतर सदस्‍यांची महापालिकास्‍तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍या मार्फत परभणी शहरातील बेघर, विस्‍थापीत झालेले कामगार, परराज्‍यातील अडकलेले कामगार, नीराश्रीत व्‍यक्‍ती, प्रवासादरम्‍यान आडकलेल्‍या व्‍यक्‍ती, तसेच उदर निर्वाहाची साधने संपुष्‍टात आलेले व्‍यक्‍ती यांना निवारागृह, अन्‍न, पाणी, वैद्यकीय देखभाल व सुविधा जिल्‍हास्‍तरीय सनियंत्रण समिती यांच्‍या समन्‍वयाने पुरविण्‍यात येणार आहे. सदर कामे पार पाडण्‍यासाठी शहरातील स्‍वयंसेवी संस्‍था, , खाजगी संस्‍था, धर्मदाय संस्‍था, सहकारी संस्‍था, व्‍यापारी, मेडीकल असोशिएशन व दानशुर व्‍यक्‍ती यांना धान्‍य स्‍वरूपात किंवा निधी स्‍वरूपात मदत करण्‍याकरीता महापालिकेच्‍या प्रभाग समिती क्षेत्राकरीताचे नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्‍त यांच्‍याशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन आयुक्‍त रमेश पवार यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The condition for paying 'tax' for tap connection is relaxed,parbhani news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: