
लातूर : महापालिकांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात प्रशासन प्रभागरचनेची तयारी करीत आहे. पण, प्रभागरचनेला मान्यता देण्याचे अधिकार नेमके कोणाला, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यात राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाने एकाच दिवशी स्वतंत्र आदेश काढून प्रभागरचनेला मान्यतेचे अधिकार स्वतःकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यात संभ्रम कायम आहे. प्रभागरचना तयार केल्यानंतर ती कोणाकडे पाठवायची, असा अधिकाऱ्यांसमोर प्रश्न आहे.