Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Congress Agitation : फुलंब्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या मदतीला विलंब होत असल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदार योगिता खटावकर यांना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत व सरसकट पंचनामे करण्याची आक्रमक मागणी केली.
Phulambri Protest

Phulambri Protest

Sakal

Updated on

फुलंब्री : तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीवर अजूनही योग्य ती मदत मिळाली नसल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. शनिवारी (ता.४) सुट्टीच्या दिवशी तहसील कार्यालयात २०२४ च्या अनुदानाच्या याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू होते. यावेळी काँग्रेसचे जगन्नाथ काळे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष वरून पाथ्रीकर, सरपंच अंबादास गायके, सोसायटी चेअरमन बाबुराव डकले, मुदतसर पटेल, प्रशांत नागरे, सदाशिव विटेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दालनात धडक देत तहसीलदार योगिता खटावकर यांना आक्रमकपणे भूमिका मांडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले आणि प्रशासन व राजकीय कार्यकर्त्यांत चांगलीच बाचाबाची रंगली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट प्रश्नांची सरबत्ती करत प्रशासनाची कोंडी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com