
तालुक्यातील गुंजोटी गावनिजाम काळात जिल्हा (पायगा) होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांचे पहिले बलिदान गेले, गावात निजामकाळात सुरू झालेली शिक्षण संस्था आहे.
उमरगा (उस्मानाबाद) : तालुक्यातील गुंजोटीत होणाऱ्या अत्यंद चुरशीच्या निवडणूकीत रंग भरत आहेत, मात्र आघाडीतील चित्र अजून स्पष्ट नाही. माजी सैनिकांनी निवडणूकीत उतरण्याचा प्रयत्न सुरू केला असून उमेदवारांची भरती करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असून शिवसेना मात्र स्वतंत्र आघाडीसाठी ठाम दिसत आहे. भाजपाला मात्र उमेदवारांची जमवाजमव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
मराठवाड्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील गुंजोटी गावनिजाम काळात जिल्हा (पायगा) होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांचे पहिले बलिदान गेले, गावात निजामकाळात सुरू झालेली शिक्षण संस्था आहे. बहुतांश लोक शिक्षित आहेत. सर्वाधिक लोकसंख्या व सात हजार २७४ मतदार संख्या असलेल्या गुंजोटी - गुंजॊटीवाडी ग्रामपंचायतीवर यापूर्वी काँग्रेस, शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. या निवडणूकीत हे दोन पक्ष महा विकास आघाडीच्या फॉर्मूल्यात एकत्र येतील की नाही याबाबत साशंकता आहे. २०१० च्या पंचवार्षिक निवडणूकीत देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिकांनी स्वंतत्र आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना सतरापैकी पाच जागा मिळाल्या होत्या. २०१५ च्या निवडणूकीत मात्र माजी सैनिकांनी आघाडी केली नव्हती, या वेळच्या निवडणूकीत मात्र त्यांनी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
सध्यस्थितीत त्यांनी नऊ उमेदवार निश्चित केले आहेत, उर्वरीत जागेसाठी उमेदवाराचा शोध सुरू आहे. स्वंतत्र आघाडी होत नसेल तर भाजपा बरोबर आघाडी करण्याची बोलणी सुरू असली तरी काही माजी सैनिकाचा मतप्रवाह विशिष्ट पक्षासोबत जाण्याचा दिसत नाही. दरम्यान शिवसेना स्वंतत्र आघाडी करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तूर्त हे तीन पक्ष उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करणार असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकोप्याच्या चर्चेत यशस्वी होतील का पहावे लागेल.
४२ जाती, उपजातीतील मतदार
गावात ४२ जाती, उपजातीतील लोकसंख्या आहे. मुस्लीम, मराठा, लिंगायत, हरिजन, मातंग, ब्राम्हण, रंगारी, धनगर, बंडगर, न्हावी, गोंधळी, तेली, तांबोळी आदी जाती, उपजातीतील मतदार आहेत.