हिंगोली : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील बोंढारे यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय पाटील बोंढारे

हिंगोली : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील बोंढारे यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

आखाडा बाळापूर - काँग्रेसचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष संजय पाटील बोंढारे यांनी अखेर शनिवारी ता. ३० मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करीत काँग्रेससह अन्य पक्षाला सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या सेना प्रवेशाने बाळापुरसह परिसरामध्ये काँग्रेसला खिंडार पडले आहे तर शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे. आखाडा बाळापूर येथील संजय पाटील बोंढारे यांनी राजकारणात उतरून आपल्या कार्यकाळात उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ते जिल्हा परिषद शिक्षण सभापती पद भोगलेला आहे. तसेच आखाडा बाळापुर शहरावर संजय पाटील बोंढारे यांचे पूर्ण निर्विवाद वर्चस्व असून ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती असो की इतर सोसायटी असो यांच्यावर त्यांचा आज पर्यंत ताबा राहिलेला आहे, मूळचे शिवसेनेचे नेते असलेले संजय पाटील बोंढारे यांनी माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांच्या समवेत २००६ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी बाळापुर सर्कलमधून निवडून येत विजय मिळविला होता.

जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा सत्ता मिळाल्याने शिक्षण व अर्थ सभापती हे अत्यंत महत्त्वाचे पद मिळाले होते. शिक्षण सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील परिसरात वर्गखोल्या शैक्षणिक विविध उपक्रम राबविले होते, त्यानंतर माजी खासदार शिवाजी माने यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याने त्यांनी काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला यांचे समर्थक असलेल्या संजय पाटील यांनी मात्र माने यांच्यासोबत राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले होते. खासदार राजीव सातव यांचे अत्यंत निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती परंतु राजीव सातव यांच्या अकाली निधनाने तालुक्यात काँग्रेसचे मोठे नुकसान झाले होते व काँग्रेस पक्षात त्यांचे मन रमत नसल्याने व गटबाजीला होत असल्याने यांनी मागेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

परंतु प्रदेशाध्यक्ष यांनी तो राजीनामा न स्वीकारता वेट अँड वॉच असे सांगितले होते. परंतु काँग्रेसमध्ये रमत नसल्याने शेवटी त्यांनी आपल्या समर्थकांसह शनिवार मुंबई येथे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. शिवसेनेमध्ये प्रवेश करत इतर पक्षांना सूचक इशारा दिला आहे. आखाडा बाळापूर परिसरात काँग्रेस पक्षाला जरी खिडार पडला असला तरी शिवसेनेची मात्र यामुळे ताकद वाढणार आहे. दरम्यान श्री. बोंढारे यांना शिवसेना जिल्हा प्रमुख हे पद देण्यात येईल असे आश्वासन दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Congress Hingoli District President Sanjay Patil Bondhare Joins Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top