Congress Leaders Submit Memorandum to Tehsildars Chair
sakal
फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी पदाधिकारी पोहोचले. मात्र, तहसीलदार उपस्थित नसल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला निवेदन देत प्रशासनाचा निषेध नोंदविला.