कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणारच - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

परभणी - 'राज्यात 2014 च्या निवडणुकीत आघाडी न झाल्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले. त्यामुळे आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सन्मानपूर्वक आघाडी होईल, यात शंका नाही. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. राज्यात आघाडीचेच सरकार आणण्याचे लक्ष्य असेल. विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परभणी-हिंगोलीतून आघाडीच्या नांदीला सुरवात झाल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी येथे सांगितले.

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवनात झालेल्या सभेत चव्हाण म्हणाले, 'राज्यात आणि देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यातून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. राज्य सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल या सरकाराला काहीच वाटत नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP Aghadi Ashok Chavan Politics