esakal | हिंगोलीत प्रियंका गांधींच्या अटकेचा काँग्रेसतर्फे निषेध | Priyanka Gandhi
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी  यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक करून लोकशाही तत्त्वाला हरताळ फासण्याचे काम केले. यामुळे गांधी चौक भागात काँग्रेस पक्षाच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करीत योगी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने केली.

हिंगोलीत प्रियंका गांधींच्या अटकेचा काँग्रेसतर्फे निषेध

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली (Hingoli) येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक करून लोकशाही तत्त्वाला हरताळ फासण्याचे काम केले. या मुद्द्यावरून सोमवारी (ता.चार) गांधी चौक भागात काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करीत योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर (Lakhimpur Kher Violence) येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात या घटनेची चर्चा होतेय. त्यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. उत्तर प्रदेश पोलिसांना प्रियंका गांधी यांना सोडावंच लागेल.

हेही वाचा: राज्य सरकारची बदमाशी चाललीय सगळी, देवेंद्र फडणवीसांची टीका

जर त्यांनी प्रियंका गांधींना सोडलं नाही तर जेलभरो आंदोलन करु, असा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बोलताना दिला. या वेळी शहराध्यक्ष बापुराव बांगर, माजी नगराध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, नगरपरिषदेचे गटनेते शेख नेहाल, तालुकाध्यक्ष शामराव जगताप, नगरसेवक अनिल नेनवाणी, जिल्हा काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे, नगरसेवक आरेफ लाला, डॉ.राजेश भोसले, मिलिंद उबाळे, आबेदअली जहांगीरदार, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष जुबेर मामु, युवक काँग्रेस हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल जाधव, अक्षय डोखोरे, संतोष साबळे, ख्वाजा पठाण, दत्ता भवर आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top