हुश्‍श ; प्रशासनाने घेतला मोकळा श्‍वास, का आणि कुठे ते वाचा...

राजेश दारव्हेकर
Sunday, 16 August 2020

हिंगोली जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची शनिवारी रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये सर्वच्या सर्व कर्मचारी निगेटिव्ह आले. यामुळे प्रशासनावरचा ताण हलका झाला आहे.  

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह, सीईओ शर्मा यांना कोरोना बाधा झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे शनिवारी (ता.१५) भीती दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये सर्वच कर्मचारी निगेटिव्ह आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा यांच्यासह आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांच्यासह कर्मचारी प्रशांत तुपकरी यांना कोरोना लागण झाली. सर्व विभाग प्रमुखांना क्वारंटाइन केल्याने मागील आठ दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत होता. जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, अतिरिक्त सीईओ डॉ.मिलिंद पोहरे, देविदास हिवाळे, महिला बालकल्याण विभागाचे गणेश वाघ, नितीन दाताळ, आत्माराम बोन्द्रे आदींनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा - स्वारातीम विद्यापीठात कोवीडच्या आव्हानावर आंतर राष्ष्ट्रीय परिषद

सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्ववत
शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. विशेष म्हणजे टेस्टमध्ये एकही कर्मचारी पॉझिटिव्ह आला नाही. त्यानुसार २७० कर्मचारी निगेटिव्ह आल्याने कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहेत. अँटीजन टेस्टसाठी डॉ. देवेन्द्र जायभाये यांच्या पथकाने कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेऊन तातडीने अहवाल जाहीर करून तपासणीसाठी परिश्रम घेतल्याने कर्मचाऱ्यातील भीती दूर झाल्याने सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्ववत सुरु होणार आहे. 

हेही वाचा - स्वातंत्र्य भारतातील दिव्यांग आजही उपेक्षीतच- राहुल साळवे

तपासणीनंतर संपूर्ण इमारत सॅनिटाईझ 
तपासणीनंतर संपूर्ण इमारत सॅनिटाईझ करून फवारण्यात आली. यानंतर सर्व पदाधिकारी, सदस्य यांची टेस्ट घेतली जाणार आहे. सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या आवारात किंवा आतमध्ये प्रवेश करावयाचा असेल तर चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे. आतमध्ये विना चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे धनवंतकुमार माळी यांनी सांगितले. जे कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणार नाहीत किंवा गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.  

गोरेगावात अँन्टीजन टेस्टमध्ये पाच पॉझिटिव्ह 
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शनिवारी अँन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात पाच जण पाँझीटिव्ह निघाले. येथे ३७१ व्यापाऱ्यांची अँन्टीजन टेस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. यात पाच जणाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तर ३६६ जण निगेटिव्ह आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्यासह डॉ.रामहारी बेले, डॉ.शिंदे, डॉ.धामने, डॉ.राजु देशमुख, डॉ.रोषन पठान, डॉ. अनिल नायकवाल, डॉ. वानखेडे, डॉ.बोरकर यांनी तपासण्या केल्या तर औषधनिर्माण अधिकारी सुनील कावरखे, राजु धामनकर, रामप्रसाद मते, चोपडे यांनी सहकार्य केले. 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consciousness; The administration took a deep breath, read why and where ..., Hingoli News