हिंगोलीकरांना दिलासा, १५ जण कोरोनामुक्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

हिंगोली ः मालेगाव व मुंबई येथील बंदोबस्‍त आटोपून परतल्यावर कोरोनाबाधित झालेल्या ८४ जवानांपैकी सोमवारी (ता.११) हिंगोलीतील ११ तर औरंगाबाद येथील दोन असे १३ जवान व अन्य चार असे एकूण १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यापैकी हिंगोलीतील पंधरा जणांना सोमवारी सुटी देण्यात आली. या वेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्‍थिती होती. सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेला अहवाल हिंगोलीकरांना दिलासादायक ठरला आहे. 

हिंगोलीकरांना दिलासा, १५ जण कोरोनामुक्‍त

हिंगोली ः मालेगाव व मुंबई येथील बंदोबस्‍त आटोपून परतल्यावर कोरोनाबाधित झालेल्या ८४ जवानांपैकी सोमवारी (ता.११) हिंगोलीतील ११ तर औरंगाबाद येथील दोन असे १३ जवान व अन्य चार असे एकूण १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यापैकी हिंगोलीतील पंधरा जणांना सोमवारी सुटी देण्यात आली. आजपर्यंत एकुण २० जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्‍हा शल्यचिकित्‍सक डॉ.किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली.

हिंगोली येथील राज्य राखीव दलातील १९४ अधिकारी व कर्मचारी मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्‍ताचा कालावधी संपल्यावर परत आले होते. त्‍यापैकी हिंगोलीचे ८३ व जालना येथील एक अशा ८४ जवानांना कोरोनाची लागण झाली. तसेच वसमत येथील दोन, जालना येथील जवानाच्या संपर्कातील दोन, जिल्‍हा शासकीय रुग्णालयातील एका परिचारिकेला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. 

हेही वाचा - हिंगोलीच्या पालकमंत्र्यांनी घेतले पतीसह वनभोजन...

तेरा जवानांचा अहवाल निगेटिव्ह  
जिल्‍ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९१ होती. त्यात वसमत येथील एक व दोन एसआरपीएफ जवान कोरोनामुक्‍त झाले होते. उपचार सुरू असलेल्या ८८ पैकी नऊ जणांना औरंगाबाद येथे पुढील उपचारसाठी पाठविले होते. औरंगाबाद येथे पाठविलेले दोन व हिंगोलीतील ११ अशा एकूण १३ एसआरपीएफ जवानांचा कोरोना अहवाल सोमवारी सायंकाळी निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

हेही वाचा - अबब, एकाच रात्री चार वेगवेगळ्या आगीच्या घटना...

यापूर्वी चौघांनी केली कोरोनावर मात 
यापूर्वी अन्य चौघांनी देखील कोरोनावर मात केली असून आज १५ जणांना हिंगोली येथे सुटी देण्यात आली. या वेळी राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक इप्पर, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. दिपक मोरे आदींची उपस्‍थिती होती.

जिल्ह्यातील स्थिती 
-  एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९१
-  उपचार सुरु असलेले ६२
-  कोरोनामुक्त झालेले रुग्ण २०
-  औरंगाबादला हलविलेले नऊ

 

loading image
go to top