esakal | पायी गावाकडे निघालेल्या मजुराची वाहनाच्या धडकेत मृत्यू | Beed Accident News
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक माने

पायी गावाकडे निघालेल्या मजुराची वाहनाच्या धडकेत मृत्यू

sakal_logo
By
भास्कर सोळंके

जातेगाव (जि.बीड) : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून पायी गावाकडे निघालेल्या बांधकाम मजूराचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.पाच) सकाळी भेंड टाकळी तांडा आणि सेलू फाट्या दरम्यान घडली. अशोक सखाराम माने (वय ३०, रा. सेलू ता.गेवराई) (Gevrai) असे मृत बांधकाम मजूराचे नाव असून औरंगाबाद (Aurangabad) येथे तो बांधकाम मजूर म्हणून काम करित होता. सोमवारी (ता.चार) रोजी तो आपल्या पत्नीसह गावकडे येत असताना जातेगाव फाट्यावर उतरला. नंतर येतो असे म्हणुन तो रात्रभर घरी परतला नाही. मंगळवार भेंड टाकळी तांडा व सेलू फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर अशोक माने यांचा मृतदेह आढळून (Accident In Beed) आला. तलवाडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पोलीस शिपाई भरत गायकवाड, राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आला.

हेही वाचा: न्यायासाठी पतीने जाळून घेतले,उपोषणाला बसलेली पत्नीही झाडावर चढली

अशोक माने यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. माने हा गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद येथे बांधकाम कंत्राटदार यांच्या अधिपत्याखाली मजूर म्हणून काम करत होता. ऊसतोडणीची उचल घेतल्याने तो गावाकडे आपल्या पत्नीसह येत होता. मात्र, जातेगाव फाटा येथे उतरून नंतर येतो असे म्हणणा-या अशोक माने याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू ग्रामस्थ यांना हळहळ व्यक्त करणारा ठरला आहे.

हेही वाचा: UP: प्रियंका गांधी पोलीसांचा प्रोटोकॉल तोडून लखीमपुर मध्ये रवाना

loading image
go to top