Medical College : मेडिकल कॉलेज बांधकामाच्या हालचाली सुरू; हिंगोलीत इमारतीसाठी ४०२ कोटींचा निधी, छत्तीसगडमधील कंपनी करणार काम
Hingoli News : हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी ४०२.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील कन्स्ट्रक्शन कंपनी या कामासाठी निवडली गेली आहे.
हिंगोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या कामाची नुकतीच निविदा निघाली. छत्तीसगड येथील कन्स्ट्रक्शन कंपनी इमारतीचे बांधकाम करणार आहे.