
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विद्यापीठ परिसरात सिटी सर्व्हे क्रमांक १०७३ वर नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम सुरू आहे. निविदेप्रमाणे केवळ नऊ महिन्यांची मुदत असताना दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले काम अनास्थेमुळे अद्यापही पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने वारंवार कंत्राटदार व बांधकाम विभागला पत्रे, स्मरणपत्रे व कायदेशीर नोटीस बजावली. आता काम अपूर्ण असल्याचा फायदा घेत वक्फ मिळकतीचा दावा दाखल झाला. न्यायाधीकरणाने तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या अर्जावर अंतिम आदेश पारित होईपर्यंत बांधकाम थांबविण्यास सांगितले. त्यामुळे हे बांधकाम थांबविल्याचे कुलसचिवांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.