esakal | विधायक बातमी : उपक्रमशील शिक्षिका शितल मापारी यांचे योगदान

बोलून बातमी शोधा

file photo}

शितल मापारी (किरण भिसडे) या शिक्षिकेने व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून डिजिटल शैक्षणिक साहित्याची निर्मिती करुन त्याचा प्रभावशाली वापर करत ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवून शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.

विधायक बातमी : उपक्रमशील शिक्षिका शितल मापारी यांचे योगदान
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : लॉकडाउनच्या काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाले होते. त्यातून शिक्षणक्षेत्रसुद्धा सुटले नव्हते. अशा भयावह स्थितीत शैक्षणिक प्रवाहामध्ये असलेले विद्यार्थी प्रवाहाबाहेर पडू नये. यासाठी जिंतूर तालुक्यातील साखरतळा येथील मायेची ऊब असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शितल मापारी (किरण भिसडे) या शिक्षिकेने व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून डिजिटल शैक्षणिक साहित्याची निर्मिती करुन त्याचा प्रभावशाली वापर करत ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवून शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.

साखरतळा या आदिवासी पाड्यावर मजूर लोकांची वस्ती आहे. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ. मापारी यांनी ऑनलाइन व प्रत्यक्ष विविध प्रयोग, उपक्रम या गावात राबवून शैक्षणिक खेळ, नकाशावाचन, नाविन्यपुर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण केली. शिवाय सकाळ- संध्याकाळच्या अभ्यासिका गटा- गटात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडीयो बनवून पालक- विद्यार्थी व्हाटसअप ग्रुपला टाकणे, व्हिडीमधून विविध प्रयोग, स्वाध्याय, उपक्रम, प्रश्नावल्या तसेच इयत्ता पहिली ते आठवीसाठी शैक्षणिक साहित्य निर्मीती असे शैक्षणिक उपक्रम राबविले. त्याचबरोबर ता. २६ डिसेंबर २०१९ ला सुर्यग्रहण- सुर्यास्त आयोजित करुन ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर केले व  विविध ऐपच्या माध्यमातून ४ डी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्ष सूर्यमाला आपल्या तळहातावर, प्राणी आपल्या वर्गात, अनॉटॉमी असे विषय हाताळले. 

पर्यावरण बचावासाठी 'धरतीबचाव' उपक्रमांतर्गत चौदा हजार बियांपासून विद्यार्थ्यांच्या साह्याने रोपवाटीका निर्माण केली. लॉकडाऊनच्या काळात "शाळा बंद शिक्षण सुरू" प्रणाली प्रभावीपणे राबविण्याकरिता पालकांचे मोबाइल नंबर मिळवणे, गृह्भेटी घेऊन गुगल मिट, दिक्षा आपच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुपद्वारे शैक्षणिक व्हिडिओ, प्रश्नावल्या, ऑनलाइन चाचण्या, विविध पी. डी. एफ.  मोबाइलवर स्वाध्याय तपासणे, फोनवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधून शैक्षणिक आढावा घेणे तसेच सहयाद्री वाहिनीवरील टिली- मिली कार्यक्रम बघायला प्रोत्साहन देणे, शैक्षणिक दिनदर्शिकेचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना जोडून ठेवणे गावात मंदिराच्या ध्वनिक्षेपकाद्वारे वुई लर्न इंग्लीशचे एपिसोड लावून इंग्रजी बोलण्याचा सराव करून घेणे. 

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवण्याचा उपक्रम देखील सध्या त्यांनी सुरू केला असून सबंध लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भल्यासाठी लढा उभारला, विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांमध्ये वाढत्या व्यसनधीनतेच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी त्यांनी गावामध्ये लोक सहभागातून व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन, धरती बचाव, पर्यावरण बचाव, जलशक्षरता, ग्राम स्वच्छता, आरोग्यविषयक सवयी अशा संदेश देणाऱ्या समाज प्रबोधनात्मक बोलक्या भिंती निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. इतरांसाठी जगता जगता इतरांची जाण पाहिजे मीही त्यातलाच एक आहे. ह्याचे जिवाला भान पाहिजे. या उद्दात्त व महन्मंगल हेतुने त्यांचे सेवाव्रत अढळ निष्ठेने  सुरू आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे