esakal | विधायक बातमी : वसमत येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रास मार्बल, ठिबक संच धम्मदान

बोलून बातमी शोधा

धम्मदान
विधायक बातमी : वसमत येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रास मार्बल, ठिबक संच धम्मदान
sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जिल्हा हिंगोली) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गुत्तेदार यशवंतराव उबारे यांनी खुरगाव (ता. नांदेड) येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी मार्बल व रोपट्यांना पाणी देण्यासाठी ठिबक संच धम्मदान म्हणून दिले.

वसमत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पूज्य भदंत पय्याबोधी यांच्याकडे हे साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी पूज्य भदंत पैयाबोधी म्हणाले ''कोरोना संसर्गाच्या भीतीनेच अनेक लोक मरत आहेत. त्यामुळे मनातील भीती अगोदर काढून टाकावी. भगवान बुद्ध म्हणतात. जग हे अनित्य आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना सुद्धा एकजीव आहे. त्यामुळे तोही संपणार आहे म्हणून प्रत्येकाने निर्भिडपणाने जीवन जगावे.

हेही वाचा - जिंतूर शिवारात दुसऱ्यांदा आढळला 'स्वर्गीय नर्तक' पक्षी

यातून आपण सहज कोरोनावर विजय मिळवाल." यशवंतराव उबारे व त्यांच्या टीमने उभारलेले वसमत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक जिल्ह्यात अत्यंत सुंदर स्मारक ठरले आहे. याप्रसंगी यशवंतराव उबारे, प्रा.सुभाष मस्के, विजयकुमार, एस. पी. मुळे, केरबाजी दातार, पी. सी .कांबळे, राजकुमार इंगळे, श्रीधर वाळवंटे आदी धम्म उपासक उपस्थित होते. दरम्यान, खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात येणाऱ्या खोलीला संगमवारी मार्बल उपलब्ध झाल्याने वैभवात भर पडणार आहे. रोपट्यांना ठिबकद्वारे पाणीही उपलब्ध होणार असल्याने परिसरात हिरवळीने नटण्यास मदत झाली आहे. यावेळी धम्मबांधवांची मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे