विधायक बातमी : एचआयव्ही संक्रमित अनाथांचा सामूहिक विवाह; परभणीच्या एचएआरसी संस्थेने पालकत्व स्विकारले

file photo
file photo

परभणी : आम्ही सेवक संस्था सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथे 66 एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांचा सांभाळ संस्थापक रवी बापटले सरांच्या देखरेखीखाली केला जातो. याच मुलांचे 2014 पासून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने स्वेच्छेने पालकत्व स्विकारुन या मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन आदी विषयावर वेळोवेळी लोकसहभागातून मदत केली जाते. बघता बघता याच प्रकल्पातील काही मुले, मुली विवाहयोग्य झालीत शिवाय स्वतः च्या पायावर कमवायला देखील लागलीत.
 
या पूर्वी मे 2019 मध्ये देखील एचएआरसी संस्थेतर्फे तीन अनाथ जोडप्यांच्या विवाह निमित्त पालकत्व स्विकारुन विवाह, रुखवतचा संपूर्ण खर्च करुन कन्यादान केले होते. 
 

चार जोडप्यांना शपथ देऊन त्यांना लगेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुपूर्द

रविवारी (ता. १४) फेब्रुवारी रोजी हॅपी इंडियन व्हिलेज प्रकल्प हसेगाव (जिल्हा लातूर) लातूर येथे चार विवाहयोग्य अनाथ जोडप्यांचा सत्यशोधक पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव प्रा. माधव बावगे यांनी चार जोडप्यांना शपथ देऊन त्यांना लगेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुपूर्द केले. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात चार वधू व चार वर यांचे पालक म्हणून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व दाते उपस्थित होते. या विवाहात एका मुलीचे कन्यादान तसेच पालकत्व व इतर जोडप्यांच्या आहेर व रुखवतचा खर्च होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी संस्था) परभणीने स्विकारुन लोकसहभागातून या जोडप्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू जसे डबल बेड पलंग, गादी, उशी, सिंगल मिरर स्टील कपाट, नवरदेव व नवरीसाठी पोशाख, दागिने, आदी खर्च करुन जोडप्यांना आशीर्वाद दिला.

डॉ. पवन सत्यनारायण चांडक यांनी कन्यादान करून जोडप्यांना आशीर्वाद दिला
  
या विवाह सोहळ्यानिमित्त सेवालय संस्थापक रवी बापटले, लातूरचे जिल्हा पोलिस उपअधीक्षक श्री नवले, कृष्णा महाडिक, संपादक जयश्री खाडिलकर,  डॉ. कणीरे, राजेंद्र कदम व डॉ. संध्या वारद,  श्री राचोटी स्वामी, प्रा. महारुद्र मंगनाळे आदी उपस्थित होते. एच. ए. आर. सी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. पवन सत्यनारायण चांडक यांनी कन्यादान करून जोडप्यांना आशीर्वाद दिला. या प्रसंगी परभणी व लातूर, हसेगाव येथील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यांची होती उपस्थिती

या सामूहिक विवाहानिमित्त परभणीतून एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक,  डॉ. महेश अवचट, राजेश्वर वासलवार, चंद्रकांत अमिलकंठवार, अर्जुन पवार हे उपस्थित होते. या विवाहासाठी एचएआरसी संस्था परभणी व सेवालय परिवार हसेगाव लातूरच्या सर्व सदस्यांनी प्रयन केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com