esakal | Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे.

Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली Hingoli जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. बुधवार (ता.१४) सकाळी दीडतास पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांमध्ये सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात २३.१० मिलिमीटर पाऊस Rain झाला आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा; हिंगोली १६.२०, कळमनुरी Kalamnuri १८, वसमत Vasmat ३५.६०, औंढा नागनाथ Aundha Nagnath ३८.२०, सेनगाव Sengaon १३.१७. या पावसामुळे शेतशिवारात पावसाचे पाणी जमा झाले आहे. त्यामुळे शेतातील कामे बंद झाली आहेत. आज बुधवारी सकाळी दीड ते दोनतास पाऊस झाला. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. सध्या ढगाळ वातावरण तयार झाले आहे.continue three days rain in hingoli district glp88

हेही वाचा: परभणीतील पालम तालुक्यात नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

पिकांच्या वाढीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र नदी-नाले व ओढ्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या जमिनी पुराच्या पाण्याने खरडुन गेले आहेत. त्यामुळे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने उद्या शुक्रवारपर्यंत (ता.१६) पावसाचा अंदाज वर्तविला आहे. वसमतमधील जलेश्वर, तर आसना नदीला आलेल्या पुराचे पाणी गावकऱ्यांच्या घरात शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच औंढा नागनाथ तालुक्यात देखील पिकांचे नुकसान झाले आहे.

loading image