esakal | परभणीतील पालम तालुक्यात नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

परभणीतील पालम तालुक्यात मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे.

परभणीतील पालम तालुक्यात नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने Heavy Rain बुधवारी (ता.१४) पालम Palam तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यांना पूर आला आहे. परिणामी, १२ गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला आहे. गंगाखेड Gangakhed-लोहा Loha राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्पा झाली आहे. तालुक्यात शनिवारपासून (ता.दहा) सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यातच मंगळवारी (ता.१३) रात्रीपासून पालम तालुक्यात Parbhani मुसळधार पाऊस सुरु झाला. बुधवारी (ता.१४) सकाळी दहापर्यंत पाऊस चालूच होता. त्यामुळे तालुक्यात पाणीच- पाणी झाले आहे. सर्व नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीची Govdavari River प्रमुख उपनदी असलेली गळाटी व लेंडी नदीला आज पहाटेपासून पूर आला आहे. दोन्ही नद्यांचे पाणी नदीपात्र सोडून जवळपास दोन हेक्‍टर क्षेत्रावरून वाहत असल्याचे दिसत आहे. heavy rain hit palam tahsil of parbhani, all rivers overflow glp88

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये पिकांचे मोठे नुकसान, तिघांचा मृत्यू

त्याखाली जवळपास ३० ते ३५ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्राखालील पिके पाण्याखाली गेली आहेत. गळाटीच्या पुरामुळे सायळा, उमरथडी, खुरलेवाडी, धनेवाडी, तर लेंडी नदीच्या पुरामुळे पुयनी, आडगाव, तेलजपुर, आरखेड, सोमेश्वर, घोडा, फळा, फरकंडा आदी गावांचा संपर्क पालम शहराशी संपर्क तुटला आहे. शिवाय, तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला पाण्याने वेढा दिला आहे. पुयनी गावातही पाणी शिरले असून आडगाव येथे दोघांची घरे पडल्याने नुकसान झाले आहे.

हेही वाचा: उत्पन्न कमी अन् खर्च दुप्पट! ऑनलाईन शिक्षणाचा पालकांना भुर्दंड

राष्ट्रीय महामार्गही बंद

राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक बुधवारी पहाटेपासून ठप्प आहे. केरवाडीजवळील पुलावरून गळाटी नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक बंद झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी हजारो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवासी पहाटेपासून अडकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणखीही पाऊस सुरूच असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही.

loading image