Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

कमी क्षमतेच्या जुन्या ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
New Transformer in Shendurwada

New Transformer in Shendurwada

sakal

Updated on: 

शेंदूरवादा - गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रांतर्गत १९९५ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झालेला पाच केव्ही क्षमतेचा जुना ट्रान्सफॉर्मर बदलून आता दहा केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या तीन सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, शुक्रवारी (ता. ३०) मान्यवरांच्या हस्ते नवीन ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ करण्यात आला.

Loading content, please wait...