- धनंजय शेटे
भूम - भूम पंचायत समितीच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची गाडी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. घटना तालुक्यातील ईट जातेगाव रोड येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.